• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नेरळ पोलिसांची जलद कारवाई! वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची दुचाकी एका दिवसात हस्तगत

ByEditor

Jun 22, 2025

गणेश पवार
कर्जत:
नेरळ आनंदवाडी येथे धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत चोरास अटक केली आणि दुचाकी हस्तगत केली आहे.

दि. १८ जून रोजी गोवंडी, मुंबई येथील २१ वर्षीय हस्नैन रजा सैंदीक सिद्दीकी हा बजाज पल्सर NS200 (MH-02 AD 5608) वरून आनंदवाडीत सहलीसाठी आला होता. त्याने दुचाकी मोकळ्या जागेत पार्क केली होती. सहल संपवून परतताना, दुचाकी गायब झाल्याचे लक्षात येताच त्याने सायंकाळी ७ वाजता नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांची शिताफीने कामगिरी

पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप फड आणि पथकातील हवालदार सचिन वाघमारे, विनोद वांगेकर यांनी तांत्रिक साधनांचा वापर करत सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान, दुचाकी चोर उल्हासनगरमधील महात्मा फुले नगर येथील रहिवासी पंकज प्रकाश कांबळे (वय १८ वर्षे १० महिने) असल्याचे निष्पन्न झाले. नेरळ पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि चोरी गेलेली दुचाकी जप्त केली.

नेरळ पोलिसांनी दिलेल्या या जलद आणि परिणामकारक कारवाईने नागरिकांच्या विश्वासाला बळकटी दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार सचिन वाघमारे करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!