जिल्हा सरचिटणीस पदी अॅड. महेश मोहिते यांची नियुक्ती
अमूलकुमार जैन
अलिबाग : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची निवड केली आहे. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार पोहचविण्यासाठी खंद्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर पक्ष वाढीच्या दृष्टीने जबाबदारी देऊ केली आहे. २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली असून रायगड लोकसभा मतदार संघातील दक्षिण रायगड जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असणारे कार्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस पदावर अॅड. महेश मोहिते, मिलिंद पाटील, बिपिन म्हामुणकर, गीता पालरेचा, प्रशांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदावर दिलिप भोईर, वैकुंठ पाटील, मनोज भागवत, राजेश मपारा, मंगेश दळवी, भालचंद्र महाले, आलप मेहता, जयवंत अंबाजी, पल्लवी तुळपुळे, श्रेया कुंटे, रश्मी वाझे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा चिटणीसपदावर विठ्ठल शिंदकर, चंद्रकांत घोसाळकर, मनोज गोगटे, सतिश लेले, परशुराम म्हात्रे, महेंद्र चौलकर, वासूदेव म्हात्रे, प्रकाश रायकर, श्रद्धा घाग, वैशाली मपारा, निलिमा भोसले यांची निवड करण्यात आली आहे .
जिल्हा कोषाध्यक्षपदावर हेमंत दांडेकर तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून मारूती देवरे, बंडू खंडागळे, अनुराधा आपटे, डॉ. मंजुषा कुदीरमोती, विनोद शहा, अक्षय ताडफळे, प्राजक्ता शुक्ला, शैलेश पटेल, जान्हवी अंजारा, संदिप ठोंबरे, डॉ. अजय जोगळेकर, सुधीर महाडिक, राजेंद्र धूमा, अमोल घोटणे, संजय भोईर, शोमेर पेणकर, नरेंद्र पाटील, नरेश खाडे, मिलिंद माने, सचिन करडे, सुरेंद्र माळी, ॲड. सुभाष पाटील, चंद्रकांत होजगे, योगेश झांजे, शोभा जोशी, भागयश्री आठवले, अप्पा देशमुख, निलम ठाकूर, तुकाराम पाटील, वंदना म्हात्रे, सुशीलकुमार शर्मा, दत्तात्रेय पाटील, प्रभाकर म्हात्रे, राजेश गोळे, स्वप्नील म्हात्रे, शांता भावे, राजेंद्र म्हामुणकर, अप्पा ढवळे, दर्शना म्हात्रे, सरिता म्हात्रे, चिन्मय मोने, अॅड. दिव्या रातवडकर, हाजी कोठारी, संदेश पालकर, रविंद्र म्हात्रे आणि मोहन पाटील यांची निवड करण्यात आली आहे .
महिला मोर्चा अध्यक्ष हेमा मानकर, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष निमिश वाघमारे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष समिर राणे, किसान मोर्चा अध्यक्ष परशूराम पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष रईस कादरी, आयुष्मान भारत सेल संयोजक दत्तात्रेय भुऱ्या पाटील, संयोजक मच्छिमार सेल माणिक बळी, कामगार आघाडी संयोजक रविंद्र पाटील, सोशल मिडिया संयोजक श्वेता ताडफळे, आयटी सेल संयोजक कौस्तुभ भिडे, दक्षिण भारतीय सेल संयोजक पी. व्ही. सनिलकुमार, शिक्षक सेल संयोजक हिरामण कोकाटे, सहकार सेल संयोजक संजय पंदेरे यांची निवड करण्यात आली आहे.
