• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

“आम्ही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असून सत्तेसाठी धर्माचे राजकारण करण्याचे दिवस संपले”, खा. सुनील तटकरेंचा विरोधकांना टोला

ByEditor

Sep 16, 2023

वैभव कळस
म्हसळा :
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतू सत्तांतरात त्या विकासकामांना स्थगिती मिळाली होती. मात्र त्यानंतर या कामांची स्थगिती उठविण्यात आली असून महाविकास आघाडीने मंजूर केलेली कामे आता लवकरच सुरु होतील असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे मतदार संघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पर्यटनाला गती मिळेल असा विश्वासही खास. तटकरे व्यक्त केला. याप्रसंगी खास. तटकरे यांनी मंजूर झालेल्या विविध कामांची माहिती दिली.

श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यासाठी एकूण ४५७ कोटींचा निधी आणला असून केवळ म्हसळा तालुक्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगून खारलँडच्या कामासाठी १० कोटी ५७ लाख, बहुउद्देशीय निवारा शेडसाठी ६१ कोटी, भूमिगत विद्युत वाहिनीसाठी ९५ कोटी ६९ लाख, जानसाई सुशोभीकरण ७ कोटी, शहरातील सीसी टीव्हीसाठी १ कोटी ६० लाख, शहराच्या पाणी योजनेसाठी ४० कोटींचा निधी आणल्याचे सांगून आम्ही धर्मनिरपेक्ष विचारसरणीला प्राधान्य देणारे असल्याचे सांगितले. सत्तेसाठी धर्माचे राजकारण करण्याचे दिवस संपले असल्याचे सांगून विरोधकांनी याचा बोध घेण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.या प्रसंगी तालुका अध्यक्ष समीर बनकर, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, गटनेते संजय कर्णिक, नाजीम हसवारे, माजी सभापती महादेव पाटिल, रेश्मा कानसे, अंकुश खडस, रियाज फकि, अनिल बसवत, छाया म्हात्रे, मीना टिंगरे, संतोष (नाना) सावंत, किरण पालांडे, शगुप्ता जहांगीर, शहानवाज उकये, जयश्री कापरे, सुमैया आमदानी, नौसीन चोगले, मंगेश म्हशीलकर आदि मान्यवर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!