• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन

ByEditor

Sep 21, 2023

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या आवाहनानुसार व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आरोग्यदायी व पर्यावरण पूरक निर्मल गणेशोत्सव माणुसकी प्रतिष्ठानने यावर्षी सुद्धा साजरा करत दीड दिवसाच्या बाप्पाचे घरगुती कृत्रिम तलावात विसर्जन केले.

माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान व सदस्य डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या सरस हॉस्पिटल जीतनगर वायशेत येथील मातीच्या बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये करण्यात आले. डॉ. हुलवान यांनी निर्मल, आरोग्यदायी, पर्यावरण पूरक गणेशोत्सव सर्वांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान सल्लागार अमृत म्हात्रे, कार्यकारी उपसचिव सुधाकर निसाद व इतर सदस्य उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!