• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अलिबागेत

ByEditor

Sep 22, 2023

अमितदादा नाईक यांच्या बाप्पाचे पत्नीसह घेतले दर्शन
अमितदादा नाईक राष्ट्रवादीचे मुरुड चणेरा मतदार संघाचे अध्यक्ष

अमुलकुमार जैन
अलिबाग :
गणपती बाप्पा मोरया …मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने सार्वजनिक गणपती बाप्पांसोबत घरगुती बाप्पा देखील विराजमान झाले आहेत. याचबरोबर अलिबाग-मुरुड चणेरा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमितदादा नाईक यांच्या अलिबाग येथील म्हात्रोळी निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे.

या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागत आहे. यावेळी अमितदादा नाईक यांच्या म्हात्रोळी निवासस्थानी विघ्नहर्ता गणेशासाठी खास आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. यावेळी इंडियन टीम कॅप्टन रोहित शर्मा यांनी आपली पत्नी रितिका हिच्यासोबत नाईक कुटुंबियांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. रोहित शर्मा अलिबागमध्ये आल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!