सलीम शेख
माणगाव : अँक्टिवा स्कुटी (दुचाकी) अपघातात पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. सदरचा अपघात रविवार, दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी माणगाव तालुक्यातील निजामपूर ते भाले गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काळ नदी पुलाच्या मागील वळणावरील रस्त्यावर घडला. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद गणेश रघुनाथ मोरे (४५) रा. भाले ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस माहिती अशी कि, यांतील आरोपी गोपीनाथ गणपत मोरे (वय-३७) रा. भाले ता. माणगाव याने त्याच्या ताब्यातील अँक्टिवा स्कुटी (दुचाकी) क्र . एमएच ०६ सीएफ ८८८६ हि गाडी स्वतः चालवीत मागील सीटवर मयत राजाराम शंकर मोरे (५२) रा. भाले ता. माणगाव हे बसले असताना आरोपी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने गाडी चालवून अपघात केला. या अपघातात राजाराम मोरे यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ .गु. रजि. नं. ३०४/२०२३ भादंवि संहिता कलम ३०४अ , २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात आली आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुणतुणे हे करीत आहेत.
