प्रतिनिधी
अलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहात्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आदर्श पतसंस्थेतर्फे रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी रविवार, 1 ऑक्टोबर २०२३ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली.
होरिझॉन हॉल, खडताळ पूलाजवळ, बुरूमखाण, वरसोली, ता. अलिबाग येथे हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पतसंस्थांचे सशक्तीकरण काळाची गरज, या विषयावर बँकींग तज्ज्ञ नितीन वाणी मार्गदर्शन करणार आहेत. कर्जवाटप, कर्जवसूली, एन.पी.ए, व्यवस्थापन, मार्केटिंग काळाची गरज या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. उदय जोशी यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. सहकारी संस्था रायगड जिल्हा उपनिबंधक प्र. का. जगताप, रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचा महासंघाचे अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनेचे उपकार्याध्यक्ष सुरेश पाटील, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील या वेळी उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण शिबीरात रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष व व्यवस्थापक सहभागी होऊ शकतील. प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक महितीसाठी अजय थळकर 9607999916, प्रितेश नाईक 9607999919 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले आहे.
