• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निकिता कामथे ठरल्या पैठणीच्या मानकरी!

ByEditor

Sep 26, 2023

सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा संपन्न

किरण लाड
नागोठणे :
येथील सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आंगरआळी यांनी महिलांसाठी खास आयोजित केलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये निकिता पंकज कामथे हिने प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेतील मानाची अशी पैठणी जिंकली आहे.

सालाबादप्रमाणे सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक स्तरावर निरनिराळे कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्याचा लाभ ग्रामस्थ तसेच गणेशभक्त गणेशोत्सवामध्ये घेत असतात. यंदा मंडळाचे २८वे वर्षे आहे. मंडळाने महिलांसाठी त्यांचा आवडता ‘होम मिनिस्टर’चा कार्यक्रम आयोजित केला होता. होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. या स्पर्धेमध्ये निकिता पंकज कामथे यांनी बाजी मारीत प्रथम क्रमांक पटकावून मानाची अशी पैठणी जिंकून प्रेक्षकांची शब्बासकी मिळवली. तसेच शिल्पा राकेश कामथे यांनी उत्तम खेळ करीत व्दितीय क्रमांक पटकावला तर अस्मिता किरण पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावून आकर्षक असे बक्षिस जिंकले.

सरखेल कान्होजी आंग्रे मित्रमंडळ गणेशोत्सव आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला शिल्पा राकेश कामथे यांनी तर तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या अस्मिता किरण पवार.

विजेत्या महिलांना बक्षीसाचे वितरण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष मयूर शिर्के, उपाध्यक्ष ओमकार पिंपळे, सचिव दिपक पडवळकर, खजिनदार वैभव जाधव, सहसचिव योगेश पवार, सहखजिनदार कल्पेश चांदविणकर, कार्याध्यक्ष पांडुरंग कामथे, महिला प्रमुख जनीताई शिर्के, अशोक गोरे, किसन शिर्के, संजय‌ पिंपळे, ॲड. शेखर कामथे, अनिल चांदविणकर, बळीराम पवार, संजय शिंदे, किशोर शिर्के, कैलास गोरे, अल्विन नाकते, पंकज कामथे, संदीप शिर्के, जितू शिंदे, प्रशांत गोरे, भरत गिजे, संदेश उतेकर, रुपेश कामथे, किरण पवार, राजू नाकते, नरेश गिजे, रोशन गोरीवले, प्रवीण पवार, प्रमोद कामथे, राकेश कामथे, मोनेश गोरे, मंदार शिर्के, अभिजित मालुसरे, पवन ठमके, करण शिर्के, शुभम जाधव, आदित्य भोय, संकेत पवार, आदित्य पिंपळे, प्रवीण बडे, प्रणित जाधव, रोहन घोगले, सार्थक खैरे, वेद वाळंज, आदेश गोरे, साहिल शिंदे, अजय सावंत, ओम कदम, निलेश पडवळकर, यश देवकर, मनीष पडवळकर यांच्यासह ग्रामस्थ, महिला, भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!