अभय पाटील
बोर्ली पंचतन : स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात भर पावसामध्ये देखील दिवेआगर समुद्र किनारा स्वछता मोहीम राबविण्यात आली.
कोकणात पावसाचा जोर असतानाच पंतप्रधानांच्या आवाहनानुसार “स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेअंतर्गत दिवेआगर ग्रामपंचायत व श्रीवर्धन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिवेआगर येथील नवेनगर या समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी लेंडे, विस्तार अधिकारी किशोर नागे, दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे, उपसरपंच वासिम फकजी, माजी सरपंच उदय बापट, ग्रामसेवक शंकर मयेकर, श्रीवर्धन पंचायत समिती तसेच दिवेआगर ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, दिवेआगर ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक तसेच दिवेआगर समुद्रकिनारी आलेले पर्यटक या स्वच्छता मोहिमेमध्ये सामील झाले.