पहा आपल्या तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचातीची होणार निवडणूक?
विशेष प्रतिनिधी
रायगड : मिनी विधानसभा समजल्या जाणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणार्या सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ या दिवशी मतदान होणार आहे.. यात रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ तालुक्यातील तब्बल २०७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या २०७ ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील १५, उरण ३, कर्जत ७, खालापूर २२, तळा ६, पनवेल १७, पेण ११, पोलादपूर २१, महाड १९, माणगाव २६, मुरुड १५, म्हसळा १२, रोहा १२, श्रीवर्धन ८, सुधागड १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. नजिकच्या काळात त्या निवडणूकांचा कार्यक्रम देखील जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी १५ तालुक्यातील या २०७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहिर झाल्याने ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची रंगीत तालीम ठरणार असल्याने या निवडणूकांना महत्व प्राप्त झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत.
रायगड जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती





