अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देतो असे सांगत फसणुक केल्याप्रकरणी आंतर राज्य टोळीस दिघा पूर्व मेदिनीपुर पश्चिम बंगाल येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (रायगड) च्यां पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून २० लाख रुपये सहित २५ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात अभिजित अप्पासाहेब वानिरे (रा. शिवाजीपेठ, ता. करविले, जिल्हा. कोल्हापूर) यांच्या मुलीस एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्यासाठी सोमेन सुधांशू मन्ना (वय 33, रा. बालाभद्रपूर, ता. कोंटाई, जिल्हा पूर्व मेदिनीपुर, वेस्ट बंगाल) याने अभिजित अप्पासाहेब वानिरे यांचे भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क साधून त्यांची मुलगी मंजिरी अभिजित वानिरे हिला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून सदर प्रवेशाकरिता ३२ लाख ५० हजार रुपये रोख रकमेची मागणी केली असता अभिजित वानिरे यांनी विश्वास ठेवून दि. 27/09/2023 रोजी आरोपी यांना अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल रविकिरण येथे ३२,५०,०००/- रुपये दिले. त्यानंतर अटक आरोपी सोमेन सुधांशू मन्ना ह्याने अप्पासाहेब वानिरे यांना दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक बंद करून पसार झाला. फिर्यादी यांचा आरोपी सोबत संपर्क होत नव्हता त्यामुळे अप्पासाहेब वानिरे यांची फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यामुळे अप्पासाहेब वानिरे यांनी अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं.247/2023 भा.द.वि.कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सदर गुन्ह्याचा जलदगतीने समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के, पोलिस हवालदार अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पोलिस नाईक सचिन वावेकर, पोलिस शिपाई लांबोटे यांचे तपास पथक तयार केले. त्यामध्ये पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के व ४ अंमलदार यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. सदर पथकाने सायबर पोलीस ठाणेचे पोलिस नाईक तुषार घरत, अक्षय पाटील यांचे मदतीने डम्प डाटा व सीडीआर बाबत तांत्रिक विश्लेषणच्या आधारे आरोपीत हे हैद्राबाद मार्गे ओरिसा या दिशेने जात असल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले असल्याची माहिती मिळताच सदर पथक हे वरिष्ठांच्या परवानगीने आरोपी यांना जेरबंद करण्यासाठी रवाना झाले. सदर तपास पथक यांनी पाठलाग करून आरोपी यांना ते जात असलेल्या त्यांचे मूळगावी रा. बालाभद्रपूर, ता. कोंटाई, जिल्हा पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल येथे पोहचण्यापूर्वीच त्यांना दिघा पूर्व मेदिनीपुर पश्चीम बंगाल या ठिकाणावरून ते पळून जात असलेल्या वाहन महिंद्रा स्कॉर्पीओसह शिताफीने ताब्यात घेतले.
सदर पथकाने ७ आरोपी पैकी सौरभ सौम्य दास (वय 43 वर्षे, रा. फ्लॅट नं. 3 ए, आसनमोल जि. वेस्ट बंगाल) सौरभ सौम्य दास (वय 43 वर्षे, रा.फ्लॅट नं. 3 ए, आसनमोल, वेस्ट बंगाल) सौरभ सौम्य दास , (वय 43 वर्षे रा.फ्लॅट नं.3 ए, आसनमोल जिल्हा.वेस्ट बंगाल), सोमेश बिरेन्द्र्नाथ बिरा (वय 27, रा. बेतालीया पो. दुर्मुत, ता. मारीस्दा, जि. पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल), अभिषेक कुमार दिलीप रज्जाक (वय 22 वर्षे रा. जोगवाणी, जि. आरडीया राज्य बिहार, मूळ रा. बालाभद्रपूर ता. कोंटाई, जि. पूर्व मेदिनीपुर वेस्ट बंगाल) या ४ आरोपी यांना दिनांक 03/10/2023 रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात् वापरलेली स्कॉंर्पीओ वाहन किंमत 5,00,000/- रुपये व फसवणूक केलेल्या रकमेपैकी 20,00,000/- रोख रक्कम आणि आरोपी याने गुन्ह्यात वापरलेला रेडमी कंपनीचा 5000/- रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 25,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यांना न्यायालयासमोर हजर करून दिनांक ८ ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदर आरोपी यांनी आणखी काही गुन्हे केलेत काय तसेच इतर ३ पळून गेलेले साथीदार व फसवणूक केलेली उर्वरित रक्कम याबाबत पुढील तपास पोलीस उपनरीक्षक विशाल शिर्के करीत आहे.
