शामकांत नेरपगार
नागोठणे : नागोठणे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असगर मुल्ला यांच्या सासूबाई श्रीमती मर्यम बेगम युनूस तांडेल यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ही माहिती शिवसेना (ठाकरे गट) नेते शिशिर धारकर यांना समजल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते असगर मुल्ला यांच्या मिरानगर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी नागोठण्यातील शेकापचे कार्यकर्ते असगर सय्यद, जगदीश वाघमारे, दिनेश काटकर, सब्रताज पानसरे, मंगेश वरंडे, गणेश काटकर, असीम कोरतकर, इसाभाई घासे, अफझल पटेल, गुड्डू पानसरे, अन्सार शेख, बबलु शेख, समिर घासे, मोहसीन तांडेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते असगर मुल्ला यांनी सांगितले कि, मी एक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता असल्यामुळे माझा व शिशिर धारकर यांचा चांगला परिचय आहे. त्यामुळे त्यांनी माझी सांत्वनपर सदिच्छा भेट घेतली. भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे असगर मुल्ला यांनी स्पष्ट केले.
