गणेश प्रभाळे
दिघी : भारतीय जनता पार्टी श्रीवर्धन तालुक्याच्या अध्यक्षपदी जयदीप तांबुटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात तांबुटकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करत श्रीवर्धन तालुका भाजपची जबाबदारी देण्यात आली. श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तांबुटकर यांना शुभेच्छा दिल्या.
