• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पनवेल पंचायत समिती आवारात कार्यालयीन वेळेत ग्रामसेवकाची वाजतगाजत मिरवणूक

ByEditor

Jun 14, 2023

घनःश्याम कडू
पनवेल :
पनवेल पंचायत समितीच्या आवारात कार्यालयीन वेळेत एका सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवकाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. याबाबत गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी याची चौकशी करण्याची मागणी ग्रामसेवकांनी व जनतेनी केली आहे.

पनवेल ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक सेवानिवृत्त झाले होते. तसेच 15 ते 20 वर्षे सेवा झालेल्या ग्रामसेवकांवर बदलीची टांगती तलवार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. असा दुहेरी आनंद ग्रामसेवकांनी वाजतगाजत साजरा केला. सदर कार्यक्रम कार्यालयीन वेळेत दि. 31 मे 2023 रोजी पनवेल पंचायत समितीच्या आवारात दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घेण्यात आला होता. यावेळी ब्रास बँडच्या तालावर ग्रामसेवक व ग्रामसेविका बेधुंद होऊन नाचत होते.

कार्यालयीन वेळेत वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक असतानाही नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम संपन्न झाला. याबाबत पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मी बघतो आणि सांगतो असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांच्याशी दोन दिवसांनी संपर्क साधला असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाहीत. तसेच ग्रामसेवक अनिल चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यात काय झाले असे उर्मट उत्तर दिले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!