सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील मोर्बा बौद्धवाडी येथील एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने मोर्बा गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना रविवार दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या मोर्बा बौद्धवाडी येथील राहते घरातून घडली आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी महिला यांची १५ वर्ष ११ महिन्यांची अपरहित मुलगी तिची उंची अंदाजे ५ फूट, रंग गहू वर्णीय, अंगाने मध्यम, डोळे तिरळे व चष्मा घातलेले, कपाळावर मध्यभागी गोंदलेले, अंगात गुलाबी रंगाचा टॉप व हिरव्या रंगाची लेगीज, पायात काळ्या रंगाची चप्पल या वर्णनाच्या अल्पवयीन मुलीला कोणत्यातरी अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गुन्हा. रजि.नं. ३१७/२०२३ भादंवि संहिता कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.
