अनंत नारंगीकर
उरण : दिव्यांग सामाजिक संस्था ही नेहमी उरण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना मदत करत असते. पिरकोण गावातील गरीब दिव्यांग महीला कल्पना गावंड यांच्या पतीचे अल्पशा आजाराने नूकतेच निधन झाले. त्यामुळे निराधार झालेल्या कल्पना गावंड या गरीब दिव्यांग महिलेला उरण मधिल दिव्यांग सामाजिक संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूची मदत देऊन एक प्रकारे आधार देण्याचे काम केले आहे.
पिरकोण गावातील कल्पना गावंड ही गरीब दिव्यांग महिला असून तीला एक लहान मुलगा आहे. नुकतेच तीच्या पतीचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे मागील तीन महिने शासनाकडून मिळणारी पेन्शन न मिळाल्याने तसेच घरातील हालाखीची परिस्थिती या समस्येच्या विळख्यात सापडलेल्या कल्पना गावंड या गरीब दिव्यांग महिले समोर मोठ संकट उभे राहिले होते. मात्र या संकटातून सदर महिलेला सावरण्यासाठी उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, समीर ठाकुर, महेश पाटील, नितिन सांगविकर, हर्षदा घरत, रनीता ठाकुर व संदेश राजगुरू हे धाऊन जात त्यांनी कल्पना गावंड या गरीब दिव्यांग महिलेला जीवनावश्यक वस्तूंची मदत करुन श्रीमंत व्यक्तींच्या डोळ्यात एक प्रकारे अंजन घालण्याचे काम केले आहे.
