वार्ताहर
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील मनमिळावू स्वभावाचे रिक्षा चालक प्रविण वडके (६४) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रवीण वडके हे दिघी पासून श्रीवर्धन पर्यंत तालुक्यात भाऊ नावाने सर्वांच्या परिचयाचे होते. कुठलेही रिक्षा भाडे असुद्या नेहमी तयार होणार अशी त्यांची खास ओळख तालुक्यात होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे.
