• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रिक्षाची टेम्पोला जोरदार धडक; अपघातात महीला जागीच ठार तर दोन जण जखमी

ByEditor

Oct 10, 2023

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड नाक्यावर घडला भीषण अपघात

शशिकांत मोरे
धाटाव :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर होणारे सततचे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. कोलाड आंबेवाडी नाक्यावर रात्री रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली. सोमवारी रात्री झालेल्या या धडकेत एक महीला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर प्रवासी वर्गाने चांगलाच संताप व्यक्त केला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपल्या ताब्यातील आयशर टेंपो क्र. एमएच १२ यूएम ४५३६ घेऊन मुंबई गोवा महामार्गावरून महाड बाजूकडे जात असताना मौजे आंबेवाडी हद्दीत सरकारी हॉस्पीटलजवळ महाड बाजुकडुन मुंबई बाजुकडे येणारी रियर रिक्षा क्र. एमएच ०६ बीव्ही ४६४२ ही वरील चालक यांने सदरची रिक्षा अतीवेगाने, बेदकारपणे चालवुन त्याच्या विरुद्ध दिशेला जावून टेम्पोच्या उजव्या बाजूला मागील बाजुचे गार्डला धडकल्याने अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षामधील मागे बसलेल्या भागीरथी खार रोहा येथील अन्वी किसन गायकर (२) हीला गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या तर सेजल किसन गायकर (३१) या महिलेस गंभीर स्वरुपाची दुखापती होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर किसन गायकर (३२) हे किरकोळ जखमी झाले असून या जोरदार झालेल्या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

दरम्यान, झालेल्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस उपनिरीक्षक अजित साबळे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात ९६ /२०२३ भादवी सं कलम ३०४, अ २८९,३३७,३३८,मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास कोलाड पोलीस करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!