गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव कुणबीवाडी येथील निलेश बांद्रे (३६) या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (१० ऑक्टो.) पहाटे ५ वाजता घडली आहे. लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून हे कृत्य त्याने केल्याचे पोलिसांकडून समजले.
दिघी सागरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी होडीवर जातो असे सांगून निलेश घराबाहेर पडला. मात्र, त्याने होडीवर न जाता आदगाव येथील जंगलात वडाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने फास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी सहा. पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी भेट दिली. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
