• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्याध्यापिका योगिनी देशमुख यांचे कौतुक

ByEditor

Oct 11, 2023

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा तालुक्यातील एम. डी. एन. फ्युचर स्कूल वरसगाव कोलाडच्या मुख्याध्यापिका योगिनी प्रशांत देशमुख यांनी ‘परीक्षे पे चर्चा’ कार्यक्रमात महत्वपूर्ण सहभाग घेऊन उत्तमरीत्या सादरीकरण केले आहे. त्यांनी केलेल्या सादरीकरणाबाबत व व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनावर पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. योगिनी देशमुख यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही असलेले आभारपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. या पत्रात देशमुख यांनी केलेल्या उत्तम सादरीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक करण्यात आल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या ‘परीक्षे पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगिनी प्रशांत देशमुख यांनी महत्वपूर्ण सादरीकरण केले.या कार्यक्रमात संपुर्ण देशभरातून शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षक बंधू आणि भगिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून व रायगड जिल्ह्यातून योगिनी देशमुख यांनी सहभाग घेऊन सद्य परिस्थितीतील शिक्षण, देश व विद्यार्थी याबाबत चांगले मतप्रदर्शन सादर केले.या कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण व व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनावर प्रभावित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाबासकी देत पंतप्रधान कार्यालयाकडून योगिनी देशमुख यांना उत्तम आरोग्यासाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांची यांची सही असलेले आभार पाठविण्यात आले आहे.

अवघ्या दोनच दिवसात हे पत्र देशमुख यांना मिळाले आहे. दरम्यान, योगिनी देशमुख यांच्या या कामगिरीबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह समाजातील स्तरातून अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!