विजयशेठ मेथा, शांतीलाल मेथा, प्रविण गांधी यांची मंडळाच्या विश्वस्तपदी सर्वानुमते निवड
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील गोरेगाव येथील रुक्मिणी शेठ मंगल कार्यालयात रविवार दि. ८ आक्टोबर २०२३ रोजी कोकण विशानेमा ज्ञाती मंडळाची ५२वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोहनभाई मेथा (गोरेगाव ) यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेत खेमचंद उर्फ विजयशेठ मेथा (माणगाव ), शांतीलाल रामचंद्र मेथा (गोरेगाव), प्रविणभाई नरसूदास गांधी (मुंबई) यांची मंडळाच्या विश्वस्तपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेला मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गांधी, उपाध्यक्ष सुबोध मेथा (इंदापूर), सेक्रेटरी भारत मेथा (गोरेगाव), सहसेक्रेटरी किरण मेथा (लोणेरा), खजिनदार जयश्री मेहता (महाड), विश्वस्त चिमणलाल मेहता (इंदापूर ), विश्वस्त जयश्री गुजर (महाड), युवा अध्यक्ष रुपेश शेट आदींसह ज्ञाती समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडळाचे नवनिर्वाचित विश्वस्त विजयशेठ मेथा, शांतीलाल मेथा, प्रविण गांधी यांचे मंडळातर्फे व उपस्थित ज्ञाती समाजबांधवांतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या निवडीबद्दल प्रसार माध्यमांजवळ बोलताना मंडळाचे नवनिर्वाचित विश्वस्त विजयशेठ मेथा म्हणाले कोकण विशानेमा ज्ञाती समाज बांधव, मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारणी तसेच सर्व सहकारी खास करून माणगांवकर ज्ञाती बांधवांनी खूप सहकार्य केले व विशेष स्नेह दिले. या निवडीचा मला विशेष आनंद झाला असून या निवडीचा ज्ञाती बांधवांना फायदा होईल असे कार्य मी करेन. गेले तीन दिवसात अनेकांनी प्रत्यक्षात भेटून तसेच दूरध्वनी, एसएमएस व व्हाट्सअँपद्वारे माझे व माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून असेच प्रेम सदैव आमच्या पाठीशी राहून श्रीनाथजीचा आशीर्वाद आम्हाला कायम लाभो हि अपेक्षा व्यक्त केली.
