• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार!

ByEditor

Oct 15, 2023

दहीवली कोंड ग्रामस्थांचा भाजपात जाहीर प्रवेश

वार्ताहर
माणगाव :
तालुक्यातील मोर्बा जिल्हा परिषद गटात शेकापला खिंडार पडला असून या गटातील दाहीवली कोंड गावातील शेकडो ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी भाजप पक्ष कार्यलय माणगाव येथे भाजप युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवून पक्षाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाले यांच्या विशेष उपस्थितीत व पक्षाचे माणगाव तालुकाध्यक्ष उमेश साटम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते भालचंद्र म्हात्रे म्हणाले की, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे पक्षात स्वागत करतो. गाव तेथे विकास हे भाजपचे धोरण असल्याने पशाचे संघटन दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पक्षाचे दक्षिण रायगड युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यावेळी बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य असतानाही शेकापमार्फत गेल्या पाच वर्षात मोर्बा मतदारसंघात जी कामे झाली असतील त्याच्या दुपटीने म्हणजेच साडे सात लाखांचा निधी मला श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मागील दोन महिन्याच्या काळात भाजपतर्फे मिळाला. भाजपची काम करण्याची कार्यपद्धती व विचार प्रणाली वेगळी आहे. आपण सुचविलेली कामे तर निश्चितच काही महिन्यात मार्गी लावू असे दोन – तीन नाही दोनशे कामे आपण करू. आपल्याला विकासकामांच्या रूपाने कायमचे नाते जोडायचे आहे. आताचे मतदार संघातील सदस्य हे कामे आणतात व आपल्याच जवळच्या ठेकेदारांना व राजकीय पुढाऱ्यांना देत असतात. आपल्याला गावाबरोबरच गावातील लोकांचा कसा विकास साधला जाईल यादृष्टीने काम करायचे असल्याचे त्यांनी सांगून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोर्बा जिल्हा परिषद गटावर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास निलेश थोरे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाध्यक्ष उमेश साटम यांनीही आपले मनोगत व्यक्त करून भाजपच्या धोरणाविषयी माहिती दिली.

यावेळी प्रवेशकर्ते दहिवली कोंड गावचे ग्रामस्थ राजेंद्र गाडे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या विचारांनी प्रभावित होऊन व निलेश थोरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आम्ही ग्रामस्थांनी शेकाप मधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास रायगड लोकसभा विस्तरक रमेश ढेबे, पक्षाचे सरचिटणीस गोविंद कासार, महेश सुर्वे, नगरसेविका ममता थोरे, तालुका उपाध्यक्ष वैभव वझे, नीलम काळे, योगेश पालकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रितेश निवाते, , तालुकाध्यक्ष उत्तर भारतीय सेना अनंत राजभर, अरुण पेणकर, परेश सांगळे,मंदार मढवी आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्बा जिल्हापरिषद गटातील दहीवली कोंड गावचे ग्रामस्थ राजेंद्र गाडे, योगेश पालकर, दत्ताराम गाडे, पांडुरंग वडेकर, भोलेनाथ वडेकर, कृष्णा पालकर, बालाजी पालकर, सुरेंद्र पालकर, प्रजोत वडेकर, रोहन पालकर, पांडुरंग पालकर, नथुराम गाडे, संतोष पालकर, अक्षय पालकर, प्रतीक पालकर, सुनील गाडे, राजेश्री गाडे, शुभांगी पालकर, मंदा गाडे, प्रगती गाडे, यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केल्याचे युवानेते राजेश गाडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले. यावेळी तालुक्यातील पेण तर्फे तळे गावचे गणेश ताम्हणकर यांनीही भाजपात प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात उपस्थित पदाधिकारी यांनी स्वागत केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!