वैशाली कडू
उरण : मुंबईहून अपहरण केलेल्या व्यक्तीची रायगड पोलिसांनी खालापूरजवळ लोधीवली सीएनजी पेट्रोल पंपावर सिने स्टाईलने सुटका केली. यात एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या धाडसी कामगिरीबद्दल विशेषतः या मोहिमेमध्ये रसायनी महिला पोलिसांचा सहभाग होता त्या सर्व महिला पोलिसांचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कोलेकर, महिला पोलीस हवालदार नेहा जाधव, सुवर्णा खाडे, महिला पोलीस प्रिया कांबळे, स्वप्नाली लोटके यांचा मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते सत्कार करून या धाडसी कामगिरीबद्दल कौतुक करण्यात आले. यावेळी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, विभाग संपर्कप्रमुख तुकाराम गायकवाड, विभागप्रमुख ज्ञानेश्वर माळी, दीपक देशमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय टेंबे, शिवाजी माळी, नंदू पाटील, वैभव कोंडीलकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
