• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोलीस असल्याची बतावणी करून ९० हजाराची सोन्याची चैन चोरून अज्ञात चोरटा पसार

ByEditor

Jun 16, 2023

सलीम शेख
माणगाव :
पोलीस असल्याची बतावणी करून ९० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून अज्ञात चोरटा फरार झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील वावे दिवाळी ते पोटनेर गावच्यामध्ये अविनाश जाधव यांच्या गॅरेजसमोर घडली. याबाबतची फिर्याद हरेश्वर संभाजी शिंदे (वय-६१) रा. रातवड ता. माणगाव
यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी हरेश्वर संभाजी शिंदे हे आल्यावर त्यांना एक अनोळखी उंच पुरुष इसम पांढऱ्या रंगाचा शर्ट व खाकी पॅन्ट घातलेला, दाढी मिशी नसलेला, अंगाने मध्यम, वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष या इसमांनी मी पोलीस असून मला सिव्हिल ड्रेसमध्ये पहाऱ्याकरीता ड्युटी नेमली आहे. याठिकाणी काल ड्रग्जची चोरी झाली आहे याकरिता मला मोठ्या साहेबांनी इकडे ड्युटीकरिता पाठविले आहे. असे सांगून त्याने फिर्यादी यांच्याजवळ असलेले ६५०० रुपये व पॉकेट तसेच गळ्यातील सोन्याची चैन जुनी वापरती २ तोळे ३ ग्राम वजनाची अंदाजीत किंमत ९० हजार रुपये त्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो असलेले लॉकेट काढून ते रुमालात ठेवून रुमालाला गाठी मारून रुमाल त्यांच्या जवळ देऊन नंतर दिलेल्या रुमालातील वस्तू फिर्यादी यांनी भारत पेट्रोल पंप पोटनेर येथे गेल्यावर पहिले असता त्यामध्ये फिर्यादी यांचे ६५०० रुपये व पॉकेट होते परंतु सोन्याची चैन व त्यामधील लॉकेट मिळून आले नाही. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. १९७/२०२३ भादंवि संहिता कलम ४२०, १७० प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. दोडकुलकर हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!