• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सिडकोची उरण सारडे येथे कारवाई

ByEditor

Jun 16, 2023

घन:श्याम कडू
उरण :
सिडकोच्या अतिक्रमण विभागाने उरण तालुक्यातील सारडे गावाजवळ असलेल्या गोदामावर कारवाई करून ते जमीनदोस्त केले आहे.

तालुक्यातील सारडे गावाजवळ कोणतीही परवानगी न घेता ७ ते ८ एकर जागेवर बेकायदेशीर गोदाम उभे केले होते. याची दखल सिडको प्रशासनाने घेत आज कारवाईचा बडगा उगारला. सिडको अतिक्रमण विभाग आज सकाळपासून सदर गोदामामधील बांधकाम जमीनदोस्त करीत होते. सिडको प्रशासनाने ठोस कारवाई केल्याबद्दल जनतेने स्वागत केले असून अशा प्रकारची ठोस कारवाई उरण परिसरात उभे असलेल्या बेकायदेशीर गोदामावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!