• कोलेटी ते सुकेळी खिंडीदरम्यान महामार्गाची केली पाहणी
• अपघात रोखण्यासाठी केल्या सूचना
किरण लाड
नागोठणे : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रं. 66 वरील वारंवार होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात याकरिता रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार कोलेटी ते सुकेळी खिंडीदरम्यान महामार्गावर आढावा पाहणी दौरा घेण्यात आला.

मुंबई, गोवा राष्ट्रीय महामार्गावर येणारे कोलेटी ते सुकेली खिंडीदरम्यान वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी कोणत्या आवश्यक उपाययोजना करता येतील याकरिता पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध खात्यातील सरकारी अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामध्ये सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, नागरिक यांनी काही सुचना केल्या. नागोठणे, पेण-पोयनाड रस्ता रिलायन्स सर्कल येथे स्पिड ब्रेकर बसविणे, दिशा दर्शक फलक, वेग मर्यादा फलक बसविणे, शेतपळस, पळस, निडी, कामत हॅाटेल, मिरानगर, रुची हॅाटेल समोरचा रस्ता, नागोठणे हायवे नाका प्रवेशद्वार, चिकणी, वाकण फाटा, वाकण, जिंदाल कंपनी ते सुकेळी, सुकेळी खिंडीपर्यंत नादुरुस्त रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे, गावाचे नामफलक लावणे, शाळा, हायस्कुल दर्शक फलक लावणे, गतिरोधक टाकुन त्यावर सफेद पट्टे मारणे, गावच्या, शाळेच्या ठिकाणी झेब्रा क्राॅसिंग लाईन मारणे अशा विविध उपाययोजना कराव्या लागणार असल्याच्या सूचना करण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी नागोठणे सपोनि संदिप पोमण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत तिरसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिग्विजय काळे, सपोनि जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग प्रशांत जाधव, महामार्ग मदत केंद्र वाकण सपोनि सहाणे, राष्ट्र्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी महेश कुमार, लोकेश चॅपेल, संपर्क अधिकारी कल्याण टोल विजय चने, नागोठणे मंडळ अधिकारी भास्कर गुंड, तलाठी सजा नागोठणे गणेश विटेकर, पोसई नागोठणे नारायण चव्हाण, पोलीस हेड कॅान्टेबल विनोद पाटील, पत्रकार महेंद्र म्हात्रे, महेंद्र माने, नागोठणे ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे उपस्थित होते.