घन:श्याम कडू
उरण : ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. जासई ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी शेकाप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे-बहुजन मुक्ती पार्टी महायुतीचे माजी सरपंच संतोष घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उरण तालुक्यातील जासई, दिघोडे व चिरनेर या तीन ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होत आहे. जासई ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी विद्यमान माजी सरपंच संतोष घरत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. थेट सरपंच पदासाठी महायुतीचे उमेदवार संतोष घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सरपंच असताना संतोष घरत यांनी केलेल्या विकासकामांमुळे जासई ग्रामपंचायतमधील मतदारांची पसंती असल्यामुळेच त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदार सांगतात.
