कुत्र्याला रेबीज झाल्याचा सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचा दावा
विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड नाक्यावर गेली चार ते पाच दिवसापासुन पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ लोकांना चावा घेतल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन त्या पिसाळलेल्या कुत्र्याला रेबीज रोग झाल्याचे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेकडून सांगण्यात आले.
शेवटी रेबीज झालेल्या कुत्र्याला पकडण्यामध्ये सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला यश आले व लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असुन रेबीज झालेल्या कुत्र्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार होत नाही मग तो मनुष्य असो किंवा कुत्रा, त्या पकडलेल्या कुत्राचाही मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कुत्रा चावल्यानंतर वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये फार कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळे जगभरात दरवर्षी ५९ हजारपेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले असुन जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यु एकट्या भारतात नोंदविण्यात येतात. सामान्यांना या आजाराबद्दल फार माहिती नाही त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचे प्रयत्न करावे असे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सागर दहिंबेकर, उपाध्यक्ष निलेश लोखंडे, सदस्य अखिलेश यादव, संदेश यादव यांच्याकडून सांगण्यात आले.
