• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड

ByEditor

Oct 20, 2023

तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुक

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील जासई, चिरनेर आणि दिघोडे या तीन महत्त्वाच्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून येत्या ५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ही शुक्रवार दि, २० ऑक्टोबर २०२३ असल्याने तीनही ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरण नगर परिषद येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या उरण तालुक्यातील चिरनेर, दिघोडे, जासई ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ५ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या तीन ग्रामपंचायतचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सोमवार, दि. १६ ऑक्टोबर ते शुक्रवार २० ऑक्टोबरपर्यंत तारीख देण्यात आली आहे. तर त्या नामनिर्देशन पत्राची छाननी ही सोमवार २३ ऑक्टोबर रोजी ११ पासून ते छाननी संपेपर्यंत वेळ असणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दि. बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी २ वाजेपर्यंत असणार आहे.

त्यामुळे सदर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने तीनही ग्रामपंचायत हद्दीतील इच्छुक उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवारी, (दि. २०) उरण नगरपरिषदे येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, निळकंठ घरत, प्रकाश ठाकूर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, महिला नेत्या ज्योती सुरेश म्हात्रे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, मिलिंद पाडगांवकर, राजेंद्र भगत, अलंकार परदेशी, शेकापचे तालुका चिटणीस विकास नाईक, ज्येष्ठ नेते नरेश घरत, सुरेश पाटील, सीमा घरत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुका मनसे अध्यक्ष सत्यवान भगत, तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, राकेश भोईर, विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर, अजित ठाकूर, राजेंद्र पाटील, दिनेश लाल धनगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोज भगत,बहुजन नेते संतोष घरत यांच्या उपस्थितीत उमेदवारीनी थेट सरपंच पदासाठी व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच अपक्ष उमेदवारांनीही आपआपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!