शामकांत नेरपगार
नागोठणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नागोठणे जवळील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आंबेघर येथील मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते साईनाथ धुळे यांची मनसे रोहा तालुका अध्यक्षपदी निवड झाली असल्याचे पत्र मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिले असून हे पत्र शनिवारी (दि. 21) रोजी मनसेच्या माणगाव येथील मध्यवर्ती कार्यालयात मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या हस्ते साईनाथ धुळे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी उप जिल्हाध्यक्ष मृदासभाई तोंडलेकर, मनसे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष सुशांत पाटील, फैजल पोपेरे, चिमण सुकदरे, राहुल काते, मनसे महिला रोहा तालुका अध्यक्षा दिपश्री घासे, रोहा तालुका उपाध्यक्ष किशोर कापसे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी साईनाथ धुळे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण आपल्या क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय धोरणे व कार्यक्रम वेळोवेळी निष्ठेने रबावावा. यामध्ये आपणकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. आपण व आपल्या सहकार्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही असे आपले वर्तन असेल हिच अपेक्षा. आपली नेमणूक एक वर्षाचा कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संधर्भात निर्णय घेतला जाईल. मराठी बांधवांना भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारे कार्य आपल्या हातून घडेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना व आपणास आपल्या पदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा.
