• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडमध्ये जलजीवनचे दहा टक्केही काम पूर्ण नाही?

ByEditor

Oct 23, 2023

• जिल्हा परिषद प्रशासनाचा १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचा दावा!
• करोडोंची बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून “ईडी”कडे तक्रार करण्याची सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांची मागणी

मिलिंद माने
मुंबई :
रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४२२ नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. या योजनांचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, मात्र आतापर्यंत ९५ योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच रायगडमध्ये जलजीवन नळ पाणीपुरवठा योजनांची दहा टक्केही काम पूर्ण नसतानाही जिल्हा परिषद प्रशासन १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचा दावा करीत असल्याची टीका अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या संगनमताने करोडोंची आर.ए. बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून केंद्र सरकारच्या “ईडी” कडे फसवणुकीबद्दल तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणीच सावंत यांनी शासनाकडे केली आहे.

रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या १ हजार ४२२ नळ पाणीपुरवठा योजनांसाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. कामांच्या वाटपापासूनच यात भ्रष्टाचार झाला आहे. ज्या योजना पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहेत, त्या जुन्याच असून रंगरंगोटी करून नव्या दाखवल्या आहे. तर ज्‍या योजना पूर्ण होत आहेत, त्यांना पुरेसे पाणीच नसल्‍याने कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्‍यता आहे असा खळबळजनक दावा संजय सावंत यांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना

रायगड जिल्ह्यात अलिबागमधील ८, कर्जत ४, महाड ४, माणगाव ११, म्हसळा ६, मुरूड ७, पनवेल १, पेण ९, पोलादपूर १२, रोहा ८, श्रीवर्धन ११, सुधागड १०, तळा ३, उरण १ अशा एकूण ९५ योजना पूर्ण झाल्या आहेत. या योजनांवरती काम करणाऱ्या ठेकेदारांपैकी निकृष्‍ट काम करणारे ८४ कंत्राटदार असून या
नियुक्‍त कंत्राटदारांपैकी निकृष्ट काम करणाऱ्या ८४ जणांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. त्यांनी कामात सुधारणा न केल्यास कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे करणाऱ्या ठेकेदारांपैकी दिरंगाई तसेच योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा डॉ. बास्टेवाड यांनी दिला आहे. ९५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. महिनाभरात ७४ योजनांची कामे पूर्ण होतील. सुरू असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना ठेकेदार, अधिकारी यांना दिल्‍या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी सांगितले आहे.

महाड व पोलादपूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी कामे झाली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे:

कोथरूड, तळोशी,. रावतळी, नागाव, सिंगर कोंड, पंदेरी, राजीवली, राजेवाडी, किंजळोली, किये वाडकर पठार, नडगाव तर्फे तुढील, वाळण खुर्द, रानवडी, कांबळे तर्फे महाड, किंजळोली बुद्रुक, केभुर्ली, कावळे, तळीये, निजामपूर आदिवासी वाडी, सुतार कोंड गोमेंडी दाभोळ, चाडवे, किंजलघर, मुठवली, लाडवली, टेमघर, अप्पर तुढील, धामणे, बेबलघर, कोंल, वडवली, पाने, कडसरी लिंगाणा, रुपवली, भोराव, सव, दहिवड, मांगरून तर्फे देवघर, उंदेरी, वारंगी, फाळकेवाडी, गवाडी, वसाप, उगवत कोंडोशी, कुरले, चोचिंदे, वाळसुरे, पिंपळवाडी, काळीज, मुमुरशी, कोंझर, वाघोली, रामदास पठार, शिरवली, कावळे तर्फे विन्हेरे, कोठेरी, केतकीचा कोंड, मोहपरे, दादली, करंजखोल, नेराव, पांगरी, नांदगाव बुद्रुक, बारसगाव, कोळोश, सादोशी, निगडे, दुरुप कोंड, कांबळे तर्फे बिरवाडी, गावडी, दापोली, निजामपूर, पारवाडी, आसनपोई, आकले, पारमाची, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, पिंपळकोंड, मोहोत, साकडी, गोठवली, पाले, सुतारकुंड, चांभार खिंड, नाते, कोकरे तर्फे गोवेले, नातोंडी, शेवते, चाप गाव, कोंडीवते, शेल, भावे, मांडले, झोळीचा कोंड, बीजघर, कोकरे, वरंध, पडवी, पुन्हाडे तर्फे नाते, वीर, चाढवे बुद्रुक, घावरे कोंड, केभुर्ली, आंबिवली बुद्रुक व खुर्द , जिते, करंजाडी, गोंडाळे विन्हेरे, कोंडमालूसरे खुटील, सवानेवाडी, पाचाड, नडगाव तर्फे बिरवाडी, आचळोली, खर्डी, रेवतळे, कसबे शिवथर, वाघेरी, शिरगाव, नरवण, डोंगरोली, बावले, लोअर तुडील, आमडोंशी, आडे या महाड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना आहेत.

पोलादपूर तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना पुढीलप्रमाणे;
काटेतळी ,देवळे, बोरावळे, कामठे ,पैठण, किनेश्वर, धामणदेवी, तुर्भे खुर्द रानबाजीरे, वझरवाडी, तुटवली, देवळे कामठे, करंजे कोसमवाडी, लोहारे, बोरज, संवाद, देवळे, कोतवाल खुर्द, मोरगिरी, वडघर, तुर्भे बुद्रुक व तुर्भे कोंडा, खांडज, हळदुले, चांदले, देवपूर, केवनाळे, नाणेघोळ, महाळुंगे, सढवली नावाळे, खोपड, दिव्हिल, चरई, क्षेत्रफळ, फौजदारवाडी, धारवली, चांडके, वावे, रानवडी बुद्रुक, ओबळी, चोळई, निवे, ढवळे, पार्ले, कातळी, बोरघर, कुडपण बुद्रुक, आंग्रेकोंड, रान कडसरी, माटवन, कालीवली, कुडपण खुर्द, खडकवणे, कोंडवी, घागरकोंड, बोरावळे, साळवी कोंड, चिखली, तामणे, खडपी, दाभिळ, गांजवणे, संवाद, आढावळे, करंजे, महालगुर, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक, गोलधरा, लहूळसे, परसुले, चांभार गणे खुर्द, गोवेले, फणसकोंड ,साखर या पोलादपूर तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना आहेत.

महाड व पोलादपूर तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे करणाऱ्या एकेका ठेकेदाराच्या नावावर अनेक नळ पाणीपुरवठा योजना असल्याने प्रत्यक्षात मूळ ठेकेदार काम न करता उप ठेकेदार काम करीत आहेत. त्यामुळे कामाची कोणतीही कुशलता या उप ठेकेदारांकडे नसल्याने अनेक नळ पाणीपुरवठा योजनांची कामे प्रत्यक्षात बोगस व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अनेक नळ पाणीपुरवठा योजनांचे पाईप हे दोन मीटर खोलीवर टाकणे गरजेचे असताना अर्धा मीटर ते एक मीटर खोलीवर टाकण्यात आल्याने अनेक नळ पाणीपुरवठा योजनांचे पाईप पावसाच्या पाण्याने माती वाहून गेल्याने उघडे पडले आहेत. महाड व पोलादपूर तालुक्यातील अनेक नळ पाणीपुरवठा योजना या जुन्या योजना कार्यान्वित असताना त्या ठिकाणी नवीन योजना दाखवून बहुतांशी उप ठेकेदार हे करोडपती झाले असून जे मोटरसायकल व एसटीमधून प्रवास करत होते ते आज 25 ते 30 लाखाच्या आलिशान गाडीमध्ये प्रवास करीत आहेत. एवढा पैसा एक वर्षात कुठून आला? असा सवाल स्थानिक नागरिक या निमित्ताने शासनाला विचारत आहेत. नळ पाणीपुरवठा योजनांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने त्याचा परिणाम येत्या चार महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जाताना त्याचा प्रत्यय प्रशासनाला व स्थानिक ग्रामस्थांना आल्याशिवाय राहणार नाही. उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अनेक नागरिकांकडून प्रशासनाकडे होत आहे मात्र, प्रशासन पुढाऱ्यांच्या हाती गेल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासकीय अधिकारी देखील डोळ्यावर काळी पट्टी व तोंडात मुग गिळून गप्प बसले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!