विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील आमडोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा बॅंक सखी वर्षा वासुदेव जांबेकर यांना शनिवार, दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी जिजामाता मंगल कार्यालय तासगाव येथे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वर्चस्व युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा ५वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य राज्यस्तरीय युवा सन्मान पुरस्कार सोहळा व राज्यस्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा वर्चस्व युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन देशमाने, सर्व पदाधिकारी व सदस्य सांगली यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला. यावेळी वर्षा जांबेकर यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वर्षा जांबेकर यांना या अगोदर दि. १६ मार्च २०२३ रोजी राज्यस्तरीय स्व. सुषमा स्वराज पुरस्कार प्रदान करण्यात आला असुन यानंतर त्यांना सात महिन्यानंतर समाजरत्न पुरस्कार चंद्रहार दादा पाटील (डबल महाराष्ट्र केसरी), सचिन थोरबोले (डीवायएसपी तासगाव ), महेंद्र दोरकर (पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सांगली), सोमनाथ वाघ (पोलिस निरीक्षक तासगाव ), सागर घोडे (सहाय्यक पोलिस निरीक्षक कवठेमहांकाळ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल वर्षा जांबेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
