अनंत नारंगीकर
उरण : दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केली जाते. सोने-चांदी खरेदीसाठी खास मुहूर्त असल्याने सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच आपट्याची पाने लुटण्यासाठी गावाची वेस ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. अशा दसरा सणाचे औचित्य साधून उरण बाजारपेठेत झेंडूबरोबर इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसून येत आहे.

दसरा या दिवशी दुर्गा देवीनी महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडवही अज्ञातवासात राहण्याकरिता यावेळी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या झाडाची व शस्त्रांची पूजा केली. तो हाच दिवस असल्याने हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जाते. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे. यावर्षी दसरा हा सण मंगळवारी (दि. २४) येत असल्याने या सणाचे औचित्य साधून उरण बाजारपेठेत झेंडू बरोबर इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
