घन:श्याम कडू
उरण : जासई ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन मुक्ती पार्टी आघाडीची आज एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. हे आघाडीला शुभ संकेत असल्याचे पदाधिकारी सांगतात.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. छाननीच्या वेळी जासई ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक ३ मधील सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ सृष्टी अमर म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी उमेदवार भाजपाच्या पौर्णिमा कांबळे यांचा जात वैधता प्रमाणपत्र अर्ज बाद झाला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ सृष्टी अमर म्हात्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषीत केले आहे. सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ सृष्टी अमर म्हात्रे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांचे माजी सभापती नरेश घरत व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.
सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ सृष्टी अमर म्हात्रे बिनविरोध निवडून आल्याने जासई ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीला शुभ संकेत मानले जात असून निवडणुकीत थेट सरपंचासह सदस्य पदांच्या सर्व जागा निवडून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
