घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती तहसिल कार्यालयातून देण्यात आली.
उरण तालुक्यातील जासई, चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ३ तर १७ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी २ तर १५ सदस्यपदासाठी २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर ९ सदस्यपदासाठी १९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. असे तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ९ तर तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ सदस्यपदासाठी ८१ असे एकूण ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाचे ७ तर सदस्य पदाचे ३८ असे ४५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. तीन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचेही वाटप करण्यात आले.