प्रतिनिधी
अलिबाग : उरण तालक्यातील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांचे शासकीय कामातील कर्तृत्व पाहून त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थान करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही लोकांनी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उरण येथील १५१९३ या खातेमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम असल्याचा दावा करण्यात आला होता. उरण शहरातील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शाखेत असणारे खाते क्रमांक १५१९३ ची पडताळणी केली असता २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत सदर खात्यामध्ये १५५/- रुपये शिल्लक असल्याची माहिती लेखी स्वरूपात ग्रामविकास अधिकारी यांना १३ ऑक्टोबर २०२३ रोजी लेखी पत्राद्वारे दिली आहे. याबाबत उरण येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांची शासकीय कार्यात होणारी उन्नत्ती पाहून काही अज्ञात लोकांनी कटकारस्थान रचून त्यांना जास्तीत जास्त कसे बदनाम करता येईल यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.
उरण येथील रायगड जिल्हा बँकेच्या खाते क्रमांक १५१९३ मध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक आढळून आल्यास ती रक्कम जो माझ्यावर आरोप करीत आहे. त्याला स्वखुशीने देणार असून काही लोक माझी नाहक बदनामी करण्याच्या प्रयत्न करीत आहेत. तरी मी या बिनबुडाच्या आरोपाचे खंडन करीत आहे.
-वैभव पाटील
तत्कालीन ग्रामविकास अधिकारी