• सरपंच पदासाठी ४ तर १६ सदस्यांसाठी ३७ उमेदवार रिंगणात
• जनसेवा विकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध
किरण लाड
नागोठणे : महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागुन राहिलेली रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तसेच रोहा तालुक्यातील प्रसिद्ध नागोठणे ग्रामपंचायतीची येत्या ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. रायगड जिल्ह्यातील मोजक्या ग्रामपंचायतीमध्ये मोठी तसेच रोहा तालुक्यातील प्रतिष्ठेची अशा नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा जनसेवा विकास आघाडी व परिर्वतन पॅनलमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळणार आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये एक लोकनियुक्त सरपंच व १७ सदस्यांपैकी जनविकास आघाडीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर एकूण 16 जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेना (उबाठा) गट, काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शेतकरी कामगार पक्ष अशी जनसेवा विकास आघाडी तर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) यांचा परिर्वतन पॅनल अशी महाविकास आघाडी व परिर्वतन आघाडी तसेच मनसे, अपक्ष उमेदवार असे सरपंच पदासाठी ४ तर १६ जागांसाठी एकून ३७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत.
नागोठणे ग्रामपंचायत मोठी असल्याने एकूण ८ हजार ५३९ मतदार यंदा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकनियुक्त सरपंच असल्याने सरपंच पदासाठी जनविकास आघाडीकडून सुप्रिया महाडिक, परिर्वतन पॅनलकडून मनिषा टके, मनसेच्या दिपश्री गुरव-घासे तर अपक्ष म्हणून शिफा मंजर जुईकर हे उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. पुरुष ५८४ तर महिला ५७६ मतदार असलेल्या तीन जागांसाठी प्रभाग क्रं. १ मध्ये जनसेवा विकास आघाडीकडून माजी सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, भक्ती जाधव व अमृता महाडिक हे तीन उमेदवार तर परिर्वतन पॅनलकडून ॲड. रमेश जाधव, पूनम इप्ते व वैशाली भोय अशी सरळ लढत बघायला मिळणार आहे. तर पुरुष ६८१ तर महिला ६९६ मतदार असलेल्या तीन जागांसाठी प्रभाग क्रं. २ मध्ये जनसेवा विकास आघाडीकडून अखलाख पानसरे, शहनाज अधिकारी, विनीता पाटील तर परिर्वतन पॅनलकडून ॲड. श्रीकांत रावकर, रिझा पानसरे, प्रतिभा तेरडे हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे असून, अपक्ष म्हणून शिफा जुईकर हिने उमेदवारी भरुन निवडणूकीत रंगत आणली आहे. तर पूरुष ५०४ व महिला ५२४ मतदार असलेल्या प्रभाग क्रं. ३ मधून यंदा दोन सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. परंतु, जनसेवा विकास आघाडीचे उमेदवार शबाना असिफ मुल्ला यांच्या विरोधात उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे.तर दुसऱ्या जागेसाठी जनसेवा विकास आघाडीकडून जन्नत जोएब कुरेशी तर परिर्वतन पॅनलकडून राधिका किरण ताडकर या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. तर सर्वात मोठा मतदार संघ म्हणजे पूरुष मतदार ११३१ तर महिला १११४ मतदारांच्या तीन जागांसाठी प्रभाग क्रं. ४ मध्ये जनसेवा विकास आघाडीकडून संतोष नागोठणेकर, ज्योती राऊत, सुल्ताना लंबाते तर परिर्वतन पॅनलकडून रोहिदास हातनोलकर, कल्याणी घाग, मिनाज कुरेशी अशी प्रतिष्ठेची लढत बघायला मिळणार आहे.
पूरुष मतदार ६३० व महिला ६४८ मतदार असलेल्या प्रभाग क्रं. ५ मध्ये तीन जागांसाठी जनसेवा विकास आघाडीकडून सचिन ठोंबरे, भाविका गीजे, ॲड. प्रकाश कांबळे तर परिर्वतन पॅनलकडून शीतल नांगरे, श्रेया कुंटे, किरण गायकवाड तसेच अपक्ष म्हणून ॲड. महेश पवार व आशा अलकुंटे हे उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे. तर पूरुष ७५३ व महिला ६९८ मतदार असलेल्या प्रभाग क्रं. ६ मध्ये तीन जागांसाठी जनसेवा विकास आघाडीकडून ज्ञानेश्वर साळुंखे, सुप्रिया काकडे, मंगी कातकरी तर परिर्वतन पॅनलकडून मंदार चितळे, संध्या सांगले, स्वाती तुरे तर अपक्ष म्हणून माधवी महाडिक व विणा जंंगले अशी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
निवडणूकीतुन माघार घेण्याच्या दिवशीच वैध उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळाली असून आता खरी निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार असून मतदारांमधून थेठ सरपंच पदासाठी शिवसेना (उबाठा), काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप यांच्या जनसेवा विकास आघाडीकडून सुप्रिया संजय महाडिक तर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना (शिंदे गट) यांच्या परिर्वतन पॅनलकडून मनीषा लक्ष्मण (बाळा) टके तर मनसेने स्वबळावर दिपश्री गुरव-घासे यांना सरपंच पदासाठी उभे केले आहे. तर शिफा मंजर जुईकर यांनी सरपंच पदासाठी अपक्ष अर्ज भरुन निवडणूकीत रंगत आणली आहे. जनसेवा विकास आघाडी व परिर्वतन आघाडीच्या उमेदवारांमध्ये खरी लढत असून सध्या तरी जनसेवा विकास आघाडीने आपला एक उमेदवार बिनविरोध निवडून आणून नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली आहे. जनसेवा विकास आघाडी व परिर्वतन पॅनलच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीमध्ये आमचाीच सत्ता येणार असा दावा ठोकलेला असला तरी घोडा मैदान दूर नाही. ६ नोव्हेंबरला निवडणूक निकाल लागल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत दावे, प्रतिदावे, आरोप यांची जुगलबंदी मतदारांना बघायला मिळणार आहे.