वैशाली कडू
उरण : राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ आज दि. ३० ऑक्टोबरपासून बेलापूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. त्या निर्णयाची अंमलबजावणी वित्त विभाग, नगरविकास तसेच आयुक्त तथा संचालक, संचालनालय कार्यालयातही अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. ते मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ आज दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून आयुक्त तथा संचालक, संचालनालय सीबीडी बेलापूर या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे सदस्य यांनीआमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असे उपोषकर्ते संतोष पवार यांनी सांगितले. या उपोषणाला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपला पाठींबा दर्शविला आहे.