अमूल कुमार जैन
अलिबाग : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे (विजिलन्स अवेरनेस विक) आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यावर्षी दि. ३१ ऑक्टोबर २०२३ते दि.०५नोव्हेंबर २०२३ या कालावधीत अॅन्टी करप्शन ब्युरो, रायगड तर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पद्धतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपले शासकीय काम करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काही वेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, शासकीय कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वीत होते. या धारणेला बदलण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरीक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. त्या अनुषंगाने दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरो विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील शासकीय कार्यालये / शाळा / महाविद्यालये / ग्रामीण भागात भ्रष्टाचाराच्या दृष्टपरिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरीकाने “भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र” घडविण्यास मदत करुन लाच मागणाऱ्याची माहिती तात्काळ द्यावी.
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in/Email- acbwebmail@mahapolice.in,फेसबुक – www.facebook.com/MaharashtraACB
मोबाईल ॲप्स – www.acbmaharashtra.net
व्हॉटसअॅप नंबर – ९९३०९९७७०० टोल फ्रि नंबर – १०६४ अँन्टी करप्शन ब्युरो, कार्यालय, रायगड, भ्रमण्वनी क्रमांक – ९८७०३३२२९१/९८२१२३३१६०/९७३०२७१५६० येथे संपर्क साधावा असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी तमाम नागरिकांना केले आहे.
मागील पाच वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केलेल्या सापळा केसेसची माहिती तसेच न्यायालयात शाबीत केसेसची माहिती
सन/ सापळा केसेस/शाबीत केसेस
२०१९/१०/०१
२०२०/०५/००
२०२१/१०/००
२०२२/१०/००
२०२३/१०/००