गावात विकास गंगा आणणार – उमेदवार प्रमोद जाधव
शामकांत नेरपगार
नागोठणे : रोहा तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच व सदस्य पदाचे तरुण तडफदार क्रियाशील उमेदवार रायगड जिल्हा नाभिक समाज संघांचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांची रोहा व तळा तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन निवडणुकी संधर्भात आढावा घेऊन प्रमोद जाधव यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करून जाधव यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान मतदार राजाने मला सरपंच म्हणून संधी दिल्यास मी माझे नेते आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून व माझे मार्गदर्शक शिवसेना शिंदे गट रोहा तालुका प्रमुख ऍड. मनोज शिंदे यांच्या सहकार्याने खांबेरे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे आणून गावात विकास गंगा आणणार असल्याची ग्वाही सरपंच पदाचे उमेदवार प्रमोद जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त दिली. प्रमोद जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा नाभिक समाजाचे सचिव महेंद्र माने, जिल्हा सल्लागार शामकांत नेरपगार, लावाद कमिटी जिल्हाध्यक्ष प्रविण खराडे, जिल्हा खजिनदार योगेश शिर्के, रोहा तालुका माजी अध्यक्ष रविंद्र टके, तळा तालुका अध्यक्ष रुपेश साळुंखे, जिल्हा कमिटी सदस्य किशोर खंडागळे आदींसह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
खांबेरे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद जाधव यांच्या विरोधात महाविकास आघाडी, शेकाप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) असे 3 उमेदवार रिंगणात असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या 6 नोव्हेंबर रोजी समजणार असले तरी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद जाधव यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रमोद जाधव यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना शिंदे गट चणेरा विभागीय अध्यक्ष शैलेश सपकाळ, नितीन शेडगे व मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.