जलजीवन योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासनाची धावपळ?
मिलिंद माने
मुंबई : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांची आढावा बैठक घेवून कडक कारवाई करण्याची तंबी दिल्यानंतर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसह बोगस ठेकेदारही ताळ्यावर आले असून कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची धावपळ सुरू झाली असून रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालु योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासन प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रीया कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४२२ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चालू असलेल्या योजनांची काम २०२४ पूर्ण होणे अपेक्षित आहे, मात्र आतापर्यंत ९५ योजनांचीच कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच रायगडमध्ये जलजीवनचे दहा टक्केही काम पूर्ण नाही आणि जिल्हा परिषद प्रशासन १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचे कौतुक करीत असल्याची टीका अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या संगनमताने करोडोंची आर. ए. बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून केंद्र सरकारच्या “ईडी” कडे फसवणुकीबद्दल तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणीच सावंत यांनी शासनाकडे केली होती.
रायगड जिल्हयातील जलजीवन योजनेमधील अनागोंदी कारभाराबाबत सावंत यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडे तक्रार केली होती. त्यानंतर केंद्र शासनाने रा.जि.प.कडून अहवाल मागविला होता. याबाबत राजिपच्या पाणीपुरवठा विभागाने सावंत यांना ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जिल्हयाचा प्रगती अहवाल माहितीसाठी दिला आहे.
रायगड जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांचा ऑक्टोबर 2023 अखेरचा रायगड जलजीवन योजनेचा प्रगती अहवाल.
तालुकानिहाय पूर्ण झालेल्या योजना पुढील प्रमाणे :-
रायगड जिल्ह्यात अलिबागमधील 8 योजना पूर्ण यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 10, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 50 आणि 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 26.
कर्जत 6 योजना पूर्ण यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 14, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 35, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 33 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 33.
महाड ४ यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 48, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 31, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 41 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 16.
माणगाव 21 यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 46, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 29 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 42.
म्हसळा 7 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 17, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10.
मुरूड 7 यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 7, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 9, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 27.
खालापूर 0 यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 49, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 8 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6.
पनवेल १ यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 40, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 47, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 21 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 10.
पेण 9 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 25, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 14, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 27 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 29.
पोलादपूर13 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 4, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 36, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 20 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6.
रोहा 8 यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 28, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 22, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 38 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 45.
श्रीवर्धन 14 यासह 0ते 25 टक्के काम झालेल्या योजना 8, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 13, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 15 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना 7.
सुधागड १० यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 6, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 37, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 26 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 6.
तळा 4 यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 5, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 11, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 12 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 18.
उरण १ यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 12, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 5, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 2 व 75 ते 100 टक्के काम झालेल्या योजना अशा एकूण 113 योजना पूर्ण झाल्या आहेत.
उरण २ यासह 0 ते 25 टक्के काम झालेल्या योजना 246, 25 ते 50 टक्के काम झालेल्या योजना 394, 50 ते 75 टक्के काम झालेल्या योजना 345 व 75ते 100 टक्के काम झालेल्या योजना 272 अशा प्रकारे एकूण 1257 योजनांचे काम प्रगतीपथावर असल्याचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संजय सावंत यांना दिला आहे.
113 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर कामांना वेग आला आहे. पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदार- पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी यांना रायगड जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात यावीत.
-संजय वेंगुर्लेकर
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा परिषद
महाड व पोलादपूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी कामे झाली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे कोथरूड, तळोशी, रावतळी, नागाव, सिंगर कोंड ,पंदेरी, राजीवली, राजेवाडी, किंजळोली, किये वाडकर पठार, नडगाव तर्फे तुढील, वाळण खुर्द, रानवडी, कांबळे तर्फे महाड, किंजळोली बुद्रुक, केभुर्ली ,कावळे, तळीये, निजामपूर आदिवासी वाडी ,सुतार कोंड गोमेंडी दाभोळ, चाडवे, किंजलघर, मुठवली, लाडवली, टेमघर, अप्पर तुढील, धामणे, बेबलघर, कोंल, वडवली, पाने, कडसरी लिंगाणा, रुपवली, भोराव, सव, दहिवड, मांगरून तर्फे देवघर, उंदेरी ,वारंगी, फाळकेवाडी, गवाडी, वसाप, उगवत कोंडोशी, कुरले, चोचिंदे, वाळसुरे, पिंपळवाडी, काळीज, मुमुरशी, कोंझर, वाघोली, रामदास पठार, शिरवली, कावळे तर्फे विन्हेरे, कोठेरी, केतकीचा कोंड, मोहपरे ,दादली, करंजखोल, नेराव , पांगरी, नांदगाव बुद्रुक, बारसगाव, कोळोश, सादोशी ,निगडे ,दुरुप कोंड ,कांबळे तर्फे बिरवाडी, गावडी, दापोली, निजामपूर, पारवाडी, आसनपोई, आकले, पारमाची, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, पिंपळकोंड, मोहोत, साकडी, गोठवली, पाले, सुतारकुंड, चांभार खिंड, नाते, कोकरे तर्फे गोवेले, नातोंडी, शेवतेचा सगाव, कोंडीवते, शेल, भावे मांडले, झोळीचा कोंड. |