आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिरसाटच्या अनिल मोरेंचा शिवसेनेत प्रवेश
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत उबाठा गटाला जोरदार धक्का बसला असून या विभागातील ठाकरे गटाचे शिरसाट येथील कार्यकर्ते अनिल मोरे यांनी आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी शिरसाट गावी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ रणपिसे, माणगाव तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, माणगाव पंचायत समितीचे माजी सदस्य सुधीर पवार, मनोज सावंत, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आदींसह निजामपूर विभागातील शिवसेना, युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
