सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील पाणस्पे गावातील मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी प्रवेशकर्ते रामदास सावंत अमित मांडवकर प्रथमेश सावंत सुरज सावंत मंगेश रसाळ गणपत मांडवकर सचिन सावंत स्वप्निल सावंत संकेत सावंत पवन धुपकर सिद्धेश मांडवकर उमेश शिंदे बबन सावंत तेजस शिंदे प्रणित रसाळ अरविंद सावंत अनिल खाडे प्रवीण रसाळ प्रफुल्ल रसाळ राकेश तुपकर दीपेश सावंत रुपेश शिंदे मंगेश सावंत राकेश शिंदे नरेश सावंत सुजल सावंत गणेश शिंदे ऋग्वेद दबडे साहिल दबडे सार्थक सावंत ओम पवार निहांत रसाळ प्रशांत पोळ कुणाल पोळ विकी पोळ भावेश शिंदे गौरव सावंत दत्ताराम मांडवकर गणपत धुपकर रमेश शिंदे सुरेश धुपकर प्रकाश धुपकर मंगेश मांडवकर मनोहर रसाळ मंगेश शिंदे जयराम पवार काशीराम शिर्के शरद मांडवकर इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचे निजामपूर ग्रामपंचायतचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी सांगितले. या प्रक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित निजामपूर ग्रामपंचायतचे सरपंच राजाभाऊ रणपिसे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गुरव तसेच निजामपूर विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.
महाड विधानसभा मतदारसंघात सध्या कार्यसम्राट आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे होत आहेत ती विकास कामे पाहून विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत रोज प्रवेश करत आहेत तसेच नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला महाड विधानसभा मतदारसंघात भरभरून यश मिळाले आहे आणि शिवसेना हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची रोज रीघ लागली असल्याचे निजामपूर ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गुरव यांनी सांगितले.
