विठ्ठल ममताबादे
उरण : आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, त्याच्या सुख दुखात सहभागी व्हावे या दृष्टिकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आदिवासी बांधवाना फराळ वाटप करून आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी केली जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्कादेवी वाडीवरील आदिवासी बांधवाना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. तसेच विमला तलाव ज्येष्ठ नागरिक कट्टा उरण तर्फे आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. विमला तलाव ज्येष्ठ नागरिक कट्टा उरणचे अध्यक्ष चंद्रकात मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली उरण कोटनाका येथील सामाजिक कार्यकर्ते व विमला तलाव ज्येष्ठ नागरिक कट्टाचे सदस्य सुरेश जनार्दन भोईर यांच्या माध्यमातून हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्याचे एमएसईबीचे निवृत्त कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश जनार्दन भोईर यांनी सांगितले. फराळ वाटप व शैक्षणिक साहित्य मिळाल्याने आदिवासी बांधवानी आनंद व्यक्त केला व आदिवासी बांधवांनी आयोजकांचे आभार मानले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, सल्लागार सुधीर मुंबईकर, खजिनदार सुरज पवार, सदस्य सुविध म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, आकाश पवार, सादिक शेख, नितेश पवार, सुमित कोळी, नमित कोळी, पार्थ कोळी, सागर घरत, शुभम ठाकूर, हितेश मोरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकतें, प्रमुख पाहुणे म्हणून दशक्रिया विधी या मराठी चित्रपटाचे डायरेक्टर संदिप भालचंद्र पाटील, विमला तलाव ज्येष्ठ नागरिक कट्टा उरणचे सक्रिय सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. साहेबराव ओहोळ, सुरेश जनार्दन भोईर, निवृत्त शिक्षिका मिना बीरसिंग बिस्ट, शिक्षक दिपक परशुराम पाटील, किसान सभा जिल्हा सचिव जयवंत लहू पाटील, ज्येष्ठ समाजसेवक संग्राम तोगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक दिपक पाटील तर आभार प्रदर्शन शिक्षक सनी म्हात्रे यांनी केले. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
