क्रीडा प्रतिनिधी
रायगड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला शनिवार दि. १८ नोव्हेंबरपासून पोयनाड येथील झुंझारच्या क्रीडांगणावर शुभारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील एकूण १२ अकॅडमी, असोसिएशन, क्लब ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धा लिग आणि बाद पद्धतीने खेळवली जाणार असून प्रत्येक सामना हा एकदिवसीय ४० षटकांचा असणार आहे. पंधरा चेंडू आणि रंगीत कपडे हे स्पर्धेला आकर्षण निर्माण करत आहे.
कै.मिलिंद चवरकर स्मृतीचषक हि एकदिवसीय ४० षटकांची लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी पर्वणीच असणार आहे. सर्वत्र टी-२० फॉरमॅट सुरू असतांना एकदिवसीय सामने आयोजित केल्याने खेळाडूंचे कौशल्य, प्रतिभा व धैर्य पहायला मिळणार आहे. ह्यातूनच जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटू निमार्ण होतील. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी झुंझार युवक मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सचिव किशोर तावडे, दिपक साळवी, अजय टेमकर, सुजित साळवी, निहाल चवरकर, पंकज चवरकर, राजेंद्र जाधव, ॲड. पंकज पंडित, राजेंद्र जाधव, सुनील उखरुळकर, संदीप जोशी, संकेश ढोळे, आदेश नाईक, उमाशंकर सरकार, सचिन लांगी यांच्यासह पोयनाड विभागातील क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
