• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा प्रेस क्लबच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १५१ दात्यांनी केले रक्तदान

ByEditor

Dec 4, 2023

शशिकांत मोरे
धाटाव :
रोह्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व, प्रेस फोटोग्राफर कै. जनार्दन शेडगे यांच्या स्मरणार्थ रोहा प्रेस क्लब व कै जनार्दन शेडगे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १५१ पिशव्या रक्त जमा करण्यात आले. कै. जनार्दन शेडगे यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा रक्तदान करून रूग्णांचे प्राण वाचवले होते. ती भावना कायम ठेवण्याच्या उद्देशाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने गेली २१ वर्षे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे.

शिबिराच्या प्रारंभी कै. जनार्दन शेडगे यांना मंडळाचे अध्यक्ष अरूण करंबे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहा तालुका सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक आप्पा देशमुख, महेश सरदार, विलास कुलकर्णी, उस्मानभाई रोहेकर, राजेश काफरे, शैलेश रावकर आदिं मान्यवर उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे व्यवस्थापक, रोह्यातली प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व समाजसेवी संस्थानी सदिच्छा भेट दिली.

या शिबिरासाठी रोहा प्रेस क्लब अध्यक्ष राजेंद्र जाधव, कार्यक्रम समिती प्रमुख सुहास खरीवले, परिषद प्रतिनिधी शशिकांत मोरे, सरचिटणीस रविंद्र कान्हेकर, माजी अध्यक्ष नरेश कुशवाह, नंदकुमार बामुगडे, उद्धव आव्हाड, श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे, अल्ताफ चोरडेकर, संदीप सरफळे, सागर जैन, जितेंद्र जाधव, शरद जाधव, समीधा अष्टीवकर, सचिन शेडगे, विश्वजित लुमण, दिनेश जाधव, अंजुम शेटे, रविना मालुसरे, सिद्देश ममाले, सचिन साळुंखे, पराग फुकणे, कल्पेश पवार आदींसह प्रेस क्लब व शेडगे मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढीचे डाॅ दीपक गोसावी व त्यांच्या टीमने सहकार्य केले. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी रक्तदात्यांचे, सहयोगी सेवाभावी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!