घनःश्याम कडू
उरण : उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी समीर जाधव यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची अचानक बदली झाल्याने उरण शहरातील नागरिकांना धक्का बसला आहे. इंगळे यांनी अनेक समस्यां मार्गी लावण्यासाठी जातीने लक्ष दिले होते. त्यामुळे शहरातील जनतेला त्यांच्याबद्दल आदर वाटत होता. मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची माथेरान येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी समीर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समीर जाधव यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचे कर्मचारी वर्गाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
