अमुलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यातील अलिबाग-रेवस रस्त्यावरील भाल फाटा येथे दुचाकीचा समोरासमोर अपघात होवून जगन्नाथ सखाराम म्हात्रे (वय ५७ वर्षे, रा. मानी, पो. थळ, ता. अलिबाग, जि.रायगड) यांचा मृत्यू झाला तर रविकुमार ओमप्रकाश राम (रा. सायमन कॉलनी, वायशेत, ता. अलिबाग, जि.रायगड ) जखमी झाला आहे. याबाबतची फिर्याद अलिबाग पोलिस ठाण्यात श्रीनिवास विश्वनाथ म्हात्रे ( वय-३१ वर्षे, रा. मानी, पो.थळ, ता. अलिबाग, जि.रायगड) यांनी दिली आहे.
अपघातातील मयत जगन्नाथ सखाराम म्हात्रे हे दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी रात्री अकराच्या सुमारास भाल फाटा येथुन अलिबाग बाजुकडे त्यांची मोटारसायकल क्र. एमएच ०६ एन ११६८ वरुन जात असताना अलिबाग बाजुकडून भाल बाजुकडे येणारी मोटारसायकल क्र. एमएम ०१ बीझेड १८८९ हि वरील चालक रविकुमार ओमप्रकाश राम (रा.सायमन कॉलनी, वायशेत, ता.अलिबाग, ‘जि. रायगड) याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात चालवुन विरुध्द दिशेला येवुन सदर मोटारसायकलची ठोकर यांतील मयत जगन्नाथ सखाराम म्हात्रे यांचे मोटारसायकला बसल्याने अपघात झाल. या अपघातात जगन्नाथ यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस हवालदार शेलार करीत आहेत.
