• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आदर्श पतसंस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

ByEditor

Dec 4, 2023

प्रतिनिधी
अलिबाग:
सहकारात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अलिबाग येथील आदर्ष नागरी सहकारी पतसंस्थेला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सहकार भारतीच्या विद्यमाने पतसंस्थांच्या समस्या केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी दिल्ली येथे २ व ३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये अलिबाग येथील आदर्श नागरी पतसंस्थेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांचे हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, महामंत्री डॉ. उदय जोशी उपस्थित होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, जगदीश पाटील, विलाप सरतांडेल, रामभाऊ गोरीवले, भगवान वेटकोळी, संजय राऊत, मकरंद आठवले, सी. ओ. अजय थळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आदर्श पतसंस्थेला यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागातर्फे 2012 साली सहकार भूषण पुरस्कार देऊन आदर्शला गौरविण्यात आले आहे. 2003 साली आयएसओ 9001:2008 आंतरराष्ट्रीय गुणवंत नामांकन व 2017 आर्थिक वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथम आयएसओ 9001:2015 मानांकन, सहकार भारती सहकार प्रशिक्षण संस्थेतर्फे उल्लेखनीय काम करणारी संस्था म्हणून गौरव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा मुंबईसह कोकण विभागात प्रथम क्रमांकाचा आदर्श पतसंस्था पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा 2017 चा दिपस्तंभ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, सहकार भारतीच्या सहकार सुगंध मासिकातर्फे उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार, नचिकेत प्रकाशन नागपूरतर्फे सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार, बँको नाशिक तर्फे उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार 2014, रायगड जिल्हा पतसंस्था फेडरेशनतर्फे तीन वेळा उत्कृष्ट व्यवस्थापन व अहवाल स्पर्धेनिमित्त गौरव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा 2022 द्वितीय क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार हे पुरस्कार आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेला मिळाले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!