दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मधुकर घरत व उमेश ठाकूर मृत्युमुखी
अनंत नारंगीकर
उरण : दिघोडे ते गव्हाण फाटा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मधुकर घरत यांना भरधाव वेगातील कंटेनर ट्रेलरने धडक दिल्याने त्याचा मंगळवारी ( दि. ५)) सकाळी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.मधुकर घरत यांचा मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा या गावात संध्याकाळी घरी येत नाही तोच दिघोडे वेश्वी येथील पेट्रोल पंपा जवळील रस्त्यातून आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दिघोडे गावातील उमेश धनाजी ठाकूर या तरुणाला भरधाव वेगातील कंटेनर ट्रेलरने चिरडल्याची दुदैवी घटना मंगळवारी सायंकाळी ठिक ५च्या सुमारास घडली. या अपघातात उमेश ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला.
गव्हाण फाटा ते विंधणे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणारे कंटेनर यार्ड तसेच एम टी यार्ड निर्माण झाले आहेत. या यार्डमधील कंटेनर ट्रेलर चालक आपली वाहने आडवी-तिडवी रस्त्यावर उभी करून तसेच भरधाव वेगाने ने-आण करत असल्याने वारंवार अपघाताची, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अशा कंटेनर ट्रेलरची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर ठोस कारवाई केली जात नसल्याने अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मंगळवारी (दि. ५) सकाळी दिघोडे ते गव्हाण फाटा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मधुकर घरत यांना भरधाव वेगातील कंटेनर ट्रेलरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. मधुकर घरत यांचा मृतदेह रुग्णालयातून त्यांच्या विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा या गावात संध्याकाळी घरी येत नाही तोच दिघोडे वेश्वी येथील पेट्रोल पंपा जवळील रस्त्यातून आपल्या मोटारसायकलवरून जाणाऱ्या दिघोडे गावातील उमेश धनाजी ठाकूर या तरुणाला कंटेनर ट्रेलरने चिरडल्याची घटना मंगळवारी (दि. ५) पुन्हा सायंकाळी ठिक ५ च्या सुमारास घडली. या अपघातात उमेश ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी बेशिस्त वाहनचालकांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी पोलीसांनी संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला.
